हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा इशारा: राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार!
हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा इशारा: राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार!
Read More
रखडलेली अतिवृष्टीची मदत लवकरच खात्यात जमा होणार!
रखडलेली अतिवृष्टीची मदत लवकरच खात्यात जमा होणार!
Read More
थंडीचा कडाका वाढणार: विदर्भ, मराठवाड्यात पारा १० अंशाखाली!
थंडीचा कडाका वाढणार: विदर्भ, मराठवाड्यात पारा १० अंशाखाली!
Read More
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
चने की फसल को फली छेदक से बचाएं; कम लागत में ‘T-आकार’ के बर्ड पर्च
चने की फसल को फली छेदक से बचाएं; कम लागत में ‘T-आकार’ के बर्ड पर्च
Read More

डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज: राज्यात ७ डिसेंबरपासून थंडीची तीव्र लाट!

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार; पारा १० अंशाखाली जाण्याची शक्यता आणि तापमान राहणार अस्थिर.

उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव

हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी महाराष्ट्रातील वातावरणाच्या संदर्भात ताजी माहिती दिली आहे. सध्या उत्तर भारतामध्ये एका वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) पुढे सरकला आहे, तर दुसरा डब्ल्यूडी सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या या दोन प्रणालींमुळे मैदानी भागाकडे थंडीचे वारे येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील पावसाचे वातावरण आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमधील पावसाची स्थिती ६ डिसेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे आणि दोन्ही प्रकारची वादळे तसेच कमी दाबाचे पट्टे आता निवळले आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील ढगाळ परिस्थिती निवळल्याने, महाराष्ट्रात थंडी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

ADS किंमत पहा ×

राज्यात ७ डिसेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात

डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, सध्या जरी महाराष्ट्रातील थंडी हलकी असली तरी, उद्यापासून (६ डिसेंबर) राज्यात थंडी पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ७ डिसेंबरपासून महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट सक्रिय होईल. ही तीव्र थंडी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जाणवेल. थंडीची तीव्रता इतकी वाढेल की, अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसचा टप्पा देखील ओलांडू शकते. गोंदिया जिल्ह्यामध्ये ७ डिसेंबर रोजी १० अंश सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठ्याचे प्रमाण वाढत जाईल.

Leave a Comment