केंद्र सरकार देणार २५ लाख नवीन मोफत गॅस कनेक्शन; गोरगरीब महिलांना थेट अर्ज करण्याची संधी.
उज्ज्वला योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही योजना खास करून अशा गोरगरीब महिलांसाठी आहे, ज्यांच्या नावावर अद्याप गॅस कनेक्शन नाही. या योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन देत आहे.
२५ लाख नवीन कनेक्शनला मंजुरी
केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यातच या योजनेच्या विस्ताराला मंजुरी दिली होती. त्यानुसार, देशभरातील पात्र लाभार्थ्यांसाठी २५ लाख नवीन गॅस कनेक्शन वितरीत करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या २५ लाख नवीन कनेक्शनच्या वितरणासाठी आता अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे कागदपत्रे जमा करण्याची आणि कार्यालयात जाण्याची प्रक्रिया सोपी होऊन गरीब महिलांना थेट अर्ज करणे शक्य होणार आहे.
















