हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा इशारा: राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार!
हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा इशारा: राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार!
Read More
रखडलेली अतिवृष्टीची मदत लवकरच खात्यात जमा होणार!
रखडलेली अतिवृष्टीची मदत लवकरच खात्यात जमा होणार!
Read More
थंडीचा कडाका वाढणार: विदर्भ, मराठवाड्यात पारा १० अंशाखाली!
थंडीचा कडाका वाढणार: विदर्भ, मराठवाड्यात पारा १० अंशाखाली!
Read More
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
चने की फसल को फली छेदक से बचाएं; कम लागत में ‘T-आकार’ के बर्ड पर्च
चने की फसल को फली छेदक से बचाएं; कम लागत में ‘T-आकार’ के बर्ड पर्च
Read More

कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना

योजना ऑनलाइन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार जलदगतीने आर्थिक मदत; अनुदानाचे वितरण होणार सुलभ.

सानुग्रह अनुदान योजना आता ऑनलाइन

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची असलेली ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अनुदानाचा लाभ पूर्वीपेक्षा अधिक जलदगतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अनुदानाचे वितरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘महाडीबीटी फार्मर स्कीम’ अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल.

ADS किंमत पहा ×

योजनेचा उद्देश आणि गरज

या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघात, सर्पदंश किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास तसेच गंभीर अपंगत्व (उदा. दोन्ही हात-पाय निकामी होणे किंवा डोळा निकामी होणे) आल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. शासनाने ही योजना पूर्वीच्या ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’च्या जागी सुरू केली आहे. पूर्वीची विमा योजना २०१७ पासून सुरू होती, परंतु विमा कंपन्यांकडून दावे मिळणे अत्यंत कठीण झाले होते, ज्यामुळे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहायचे. त्यामुळे विमा योजनेऐवजी ही सानुग्रह अनुदान योजना शासनाच्या माध्यमातून थेट राबवण्यास सुरुवात करण्यात आली.

Leave a Comment