६ लाख शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्या थकीत शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. ही कर्जमाफी रखडल्यामुळे अकोला आणि अहिल्यानगर (अहमदनगर) यांसारख्या जिल्ह्यांतील याचिकाकर्ते शेतकरी कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टाने अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर, आता राज्य शासनाने थकीत कर्जमाफीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांच्या आत थकीत असलेल्या सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, ज्यासाठी ६ हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती, मात्र ही प्रक्रिया आजपर्यंत प्रलंबित होती.
ताज्या बातम्या
थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
















