थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
थंडीची तीव्र लाट येणार: विदर्भात पारा ८ अंशांपर्यंत घसरणार!
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
मोठी घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांना ‘३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी’
Read More
सोयाबीन बाजारात ४५०० चा आधार कायम: जळकोट, देवणीने तारले, पण ‘बिजवाई’च्या दरांनी पुन्हा संभ्रम!
सोयाबीन बाजारात ४५०० चा आधार कायम: जळकोट, देवणीने तारले, पण ‘बिजवाई’च्या दरांनी पुन्हा संभ्रम!
Read More

राज्यात ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही! पहा हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा खास अंदाज

उद्या दुपारनंतर थंडीची लाट सुरू होणार; २० डिसेंबरपर्यंत थंडी वाढणार, शेतकऱ्यांना बुरशीनाशक फवारणीचा सल्ला.

सध्याच्या ढगाळ वातावरणाची स्थिती

हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या (६ डिसेंबर २०२५) राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा यासह सर्वच भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. हे ढगाळ वातावरण केवळ आजचा दिवस (६ डिसेंबर) आणि उद्या दुपारपर्यंत (७ डिसेंबर) कायम राहील. या काळात दिवसा देखील धुकं (धुई) राहील, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घ्यावी की, हे ढगाळ वातावरण असले तरी राज्यात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सध्या पाऊस येईल या भीतीने कोणतेही शेतीचे काम थांबवण्याची गरज नाही.

ADS किंमत पहा ×

उद्यापासून थंडीची लाट सुरू

राज्यातील ढगाळ वातावरण उद्या (७ डिसेंबर) दुपारनंतर पूर्णपणे निवळेल आणि याच दिवसापासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होईल. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, थंडीची ही लाट जवळपास २० डिसेंबरपर्यंत वाढतच जाणार आहे. या काळात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे दिवसा देखील चांगला थंड झिलावा (गारवा) जाणवेल. नाशिक, निफाड, जळगाव, नांदुरा तसेच विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा येथील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, उद्यापासून चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन होणार आहे.

Leave a Comment